23.2 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानात भारताने केलेले बांधकाम पाडा

अफगाणिस्तानात भारताने केलेले बांधकाम पाडा

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेने अफगाणिस्तानमधून परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा तालिबानेने डोके वर काढले आहे. अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणांवर तालिबानने ताबा मिळवला आहे. जवळपास ८५ टक्के भागावर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधील हजारो दहशतवाद्यांनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर भारताने अफगाणिस्तान तयार केलेल्या इमारती पाडण्याच्या सूचना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने दिले आहेत.

गेल्या दोन दशकात भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारताने अफगाणिस्तानात २१८ किमी लांबीचा डेलराम ते झरांज सलमा डॅमपर्यंत रस्ता बांधला आहे. त्याचबरोबर २०१५ मध्ये अफगाणिस्तान संसद इमारतीचे काम पूर्ण करून लोकार्पण केले होते़ अफगाणिस्तानातील भारताने केलेली ही सर्वात मोठी कामे आहेत. भारताने नवा अफगाणिस्तान उभारण्यासाठी मोलाची साथ दिली होती. खासकरून शिक्षणक्षेत्रात भारतानं योगदान दिले होते़ शिक्षक आणि स्टाफला प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता.

जवळपास १० हजार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर अशरफ गनी सरकारचा उघडपणे विरोधक केला आहे. पाकिस्तानी दहशतवादी आणि तालिबानला भारताने अफगाणिस्तानात तयार केलेले बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणाही अफगाणिस्तानातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तालिबानसोबत युद्ध सुरु आहे. भारत-आफगाणिस्तान संबंध महत्त्वपूर्ण आहेत. भारताकडे अफगाणिस्तानने लष्करी मदत मागितलेली नाही. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध आहेत. भारतासोबत आमचे व्यापार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सलोख्याचे संबंध आहेत. असे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते़

ब्राह्मण समाजासाठी मायावतींचा मास्टर प्लॅन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या