27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपृथ्वीचा विनाश करणा-या लघुग्रहांवर ‘मिशन डार्ट’ यशस्वी

पृथ्वीचा विनाश करणा-या लघुग्रहांवर ‘मिशन डार्ट’ यशस्वी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासाने ‘डार्ट मिशन’ यशस्वीरित्या राबवले आहे. या डार्ट मिशन अंतर्गत नासाचे डबल स्ट्रॉयड रीडायरेक्शन स्पेसक्राफ्ट उल्केवर आदळले आहे. नासाने अवकाशात फिरणा-या डायमॉरफस लघुग्रह आणि अंतराळयानाची टक्कर घडवून आणली. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका होता.
नासाने आज पहाटे ही मोहीम यशस्वी केली. भारतीय वेळेनुसार, म्हणजेच आज (२७ सप्टेंबर २०२२ रोजी) पहाटे ४.४५ वाजता डार्ट अंतराळयानाची डायमॉरफस उल्कापिंडासोबत टक्कर झाली. यामध्ये नासाचे अंतराळयान नष्ट झाले. पण उल्कापिंडाचा वेग आणि दिशा बदलण्यात नासाला यश आले आहे.

अशा उल्का म्हणजेच लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूतही ठरु शकते. त्यामुळे नासाचे हे मिशन फार महत्त्वाचे होते आणि ते यशस्वी झाले आहे. डायमॉरफस नावाच्या लघुग्रहाशी या डार्ट अंतराळयानाची टक्कर झाली आहे. डार्ट अंतराळयानाला धडकलेल्या लघुग्रहाची लांबी ही १६९ मीटर होती. या धडकेमुळे लघुग्रहाची दिशा आणि वेग बदलण्यास मदत झाली असून त्यामुळे पृथ्वीवरील खुप मोठा धोका टळला आहे. नासाला पृथ्वीच्या जवळ अंतराळात फिरणारे ८००० निअर अर्थ ऑब्जेक्ट्स आढळले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या