21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुन्या शहराचा शोध!

सौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुन्या शहराचा शोध!

एकमत ऑनलाईन

खोदकाम सुरू असताना सापडले प्राचीन मंदिर

रियाद : सौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुने पुरातत्व अवशेष शोधण्यात आले आहेत. राजधानी रियादमधील दक्षिण-पश्चिम भागातील अल-फॉच्या जागेवर हे अवशेष सापडले आहेत.
पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी या जागेचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एरियल फोटोग्राफी, कंट्रोल पॉइंटसोबतच ड्रोन फुटेज, रिमोट सेंसिग, लेसर सेंसिग आणि अन्य उपकरणांचा वापर या सर्व्हेसाठी करण्यात आला होता.

या जागेवर सर्व्हेक्षण करताना एक महत्त्वपूर्ण गोष्ट हाती लागली आहे. या जागेवर मंदिरसदृश््य अवशेष सापडले आहेत. धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणा-या वेदीचे देखील काही अवशेष सापडले आहेत. यावरुन प्राचीन काळात इथे राहणा-या लोकांच्या आयुष्यात पूजा, अनुष्ठान याला महत्त्व होते. या मंदिराचे नाव रॉक कट मंदिर असून माउंट तुर्वाईकच्या किना-यावर वसलेले आहे. याला अलफॉच्या नावानेही ओळखले जाते.

दरम्यान, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने नवपाषाणकालीन मानव वस्तींच्या अवशेषांबाबत शोध घेण्यातही यश मिळाले आहे. त्याचबरोबर, या संपूर्ण जागेवर वेगवेगळ्या काळातील २,८०७ कबरी सापडल्या आहेत. त्यांची सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. येथे मैदान भक्ती शिलालेखांनी सजवले गेले होते जे त्यावेळच्या अल-फा लोकांच्या धार्मिक श्रद्धेची झलक देतात. जबल लहक अभयारण्यात अल-फॉच्या देवता काहलचा उल्लेख करणारा एक शिलालेख आहे.

या जागेवर प्राचीन सांस्कृतिक व संपत्ती व्यतिरिक्त एक सुनियोजित शहर वसले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या शहराच्या कोप-यावर चार बुरुज आहेत. पुरातत्व अभ्यासातून जगातील सर्वात कोरडी जमीन आणि कठोर वाळवंटी वातावरणात कालवे, जलकुंभ आणि शेकडो खड्डे यासह एका जटिल सिंचन प्रणालीचाही शोध लागला आहे. अल-फॉ पुरातत्व क्षेत्र गेल्या ४० वर्षांपासून पुरातत्व अभ्यासाचे केंद्रबिंदू आहे. विशेष म्हणजे इथे मंदिरे आणि मूर्ती पूजा करण्याची संस्कृ ती होती, असे सांगण्यात येते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या