कीव्ह : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध ९४ वा दिवसांनंतरही संपलेले नाही. पुतीन यांच्या सैन्याकडून यूक्रेनवरील हल्ले वाढवण्यात आले आहेत. अमेरिका पुढील आठवड्यात यूक्रेनला शस्त्र पुरवठा करण्याची शक्यता आहे. रशियन माध्यमांनी यावरुन अमेरिकेला धमकी दिली आहे.
रशियन माध्यमातील ओल्गा स्केबेयवा यांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिका यूक्रेनला पुढील आठवड्यात शस्त्र पुरवठा करणार आहे. त्यामध्ये लाँग रेंज मिसाइल आणि रणगाडे पुरवले जाण्याची शक्यता आहे. रशियाने डोनबासमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. यूक्रेनच्या सैन्याला माघार घ्यावी लागली आहे. त्यानंतर यूक्रेनने अमेरिका आणि नाटोकडे मागणी केली आहे.
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाची तीव्रता आणखी वाढल्यास अमेरिकेची भूमिका काय असेल, हा देखील प्रश्न आहे. अमेरिकेने दिलेली शस्त्र यूक्रेन त्यांच्या देशात असलेल्या रशियन सैन्याविरोधात वापरणार की रशियावर हल्ला करणार हे स्पष्ट झालेले नाही. अमेरिका यूक्रेनला पुढील आठवड्यात शस्त्र पाठवण्याची शक्यता आहे. अमेरिकेने यूक्रेनला ५० किमी क्षमतेपर्यंतची शस्त्र द्यावीत, अशी भूमिका अमेरिकन अधिका-यांची आहे. रशियाने ४० शहरांमध्ये जोरदार हल्ले सुरु केले असल्याचे यूक्रेनने म्हटले आहे. सर्वाधिक हल्ले डोनबासमध्ये करण्यात येत आहेत. रशियाने यूक्रेनमधील मारियूपोलवर ताबा मिळवलेला आहे. त्यानंतर डोनबासकडे मोर्चा वळवला आहे. रशियाकडून डोनबासमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात येत आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांना घराबाहेर पडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दुसरीकडे फिनलँड आणि स्वीडनने नाटोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.