मुंबई : मी पदावरुन पायउतार होऊ का, असा सवाल ट्विटरचा मालक इलॉन मस्कने विचारला आहे. पण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी त्याला थेट महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा सध्या चांगलाच तापलेला आहे.
अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्राबद्दल चिथावणीखोर ट्वीट्स केली जात आहेत. हे ट्वीट आपण केलेली नाहीत, अकाऊंट हॅक केले आहे अशी कारणे देत बोम्मईंकडून सारवासारव केली जात आहे. त्यामुळे आता नक्की ट्वीट कोणी केली आहेत, हे आता तुम्हीच सांगा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी थेट ट्विटरचा मालक इलॉन मस्कलाच केली आहे.