26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home आंतरराष्ट्रीय केंद्रिय आरोग्य मंत्रालयारकडे 80 हजार कोटी आहेत का? ; आदर पुनावाला यांनी...

केंद्रिय आरोग्य मंत्रालयारकडे 80 हजार कोटी आहेत का? ; आदर पुनावाला यांनी केले ट्विट

एकमत ऑनलाईन

ट्वीट करताना पुनावाला यांनी केंद्रिय आरोग्य मंत्रालय आणि पंतप्रधान ऑफिस यांना टॅग केले

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची  संख्या वाढत असताना भारता पुढील आव्हान आला कोरोनावरील लस आहे. याबाबत बोलताना सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे  सीईओ आदर पुनावाला यांनी सरकार कोरोना लस विकत घेण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यासाठी लागणारे 80 हजार कोटी आहेत का? असा प्रश्न विचारला आहे.

आदर पुनावाला यांनी ट्विट करत, भारतातील एकूण लसीकरणासाठी 80 हजार कोटी खर्च येणार असल्याचे म्हटलं जात असल्याचे सांगितले. त्यामुळे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडे पुढील वर्षभरासाठी 80 हजार कोटी आहेत का? कारण देशाच्या प्रत्येक भागात ही लस पोहचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. हे ट्वीट करताना पुनावाला यांनी केंद्रिय आरोग्य मंत्रालय आणि पंतप्रधान ऑफिस यांना टॅग केले आहे.

पुणे येथील सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया लस आणि डोस उत्पादनाच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आहे, जी नवीन कोरोनाच्या लसींवर काम करत आहे. त्यांच्या संभाव्य लशींमध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेका ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लशीचा समावेश आहे, जी मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन करत आहे. भारतात सीरम कंपनी या लशीचे उत्पादन करणार आहे.

धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देऊन आरक्षणाची अमलबजावणी व्हावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या