24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीय‘वन वर्ड ट्विट ट्रेंड’चा बोलबाला!

‘वन वर्ड ट्विट ट्रेंड’चा बोलबाला!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोशल मीडियावर बरेच ट्रेंड सुरू असतात जे युजर्सचे लक्ष खेचून घेतात. त्यात सर्वसामान्य जनता ते सेलिब्रिटींचाही समावेश असतो. ट्विटरवर असाच एक ट्रेंड सध्या बघायला मिळत आहे. वन वर्ड ट्रेंड या हॅशटॅगखाली हा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेण्डमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सचीन तेंडुलकर आणि नासा, आयसीसी यांसारख्या जगप्रसिद्ध संस्थाही सहभागी झाल्या आहेत.

वन वर्ड ट्विट ट्रेण्ड या ट्रेण्डखाली भरतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरयांनी ट्विट केलेला शब्द आहे क्रिकेट. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट केलेला शब्द आहे डेमोक्रेसी. ट्विटरवर हा ट्रेण्ड भलताच लोकप्रिय होऊ पाहतो आहे. आतापर्यंत अनेक नामवंत लोकांनीही या ट्रेण्डखाली ट्विट केले आहे. अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था नासा यूनिव्हर्स हा शब्द ट्विट केला आहे. आयसीसी क्रिकेट हा शब्द ट्विट करत या ट्रेण्डमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.

बड्या सेलिब्रेटींचा सहभाग
एकाच शब्दात ट्विट करण्याच्या या ट्रेंडमध्ये सामान्य युजर्सबरोबरच जगभ-यातील अनेक नेते, सेलिब्रिटी, खेळाडू आणि नामांकित लोकांचा समावेश आहे. मात्र हा ट्रेंड कसा सुरू झाला याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना आहे.

असा सुरू झाला ’वन वर्ड ट्विट ट्रेंड’
सांगितले जातेय की अमेरिकी ट्रेन सर्व्हिसशी संबंधित एक कंपनी एमट्रॅकने सर्वात आधी शुक्रवारी रात्री एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये एवळ एकच शब्द होता ट्रेन. हा एकच शब्द ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. या ट्विटनंतर हा ट्रेंड सेट झाला आणि हळू हळू जो तो हा वन वर्ड ट्विट करू लागला.

अमेरिकेतून सुरू झाला ट्रेंड
अमेरिकेतून सुरू झालेला हा ट्रेंड आता जगभरात ट्रेंड होऊ लागलाय. अमेरिकेच्या नासाबरोबरच आता आयसीसी, गूगल मॅप्स देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या