23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home आंतरराष्ट्रीय डोनाल्ड ट्रम्प : दोन आठवड्यांमध्ये करोनावरील चांगल्या बातमीची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प : दोन आठवड्यांमध्ये करोनावरील चांगल्या बातमीची घोषणा

न्यूयॉर्क : संपूर्ण जगभरात हाहाकार घातलेले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनावरील उपचारासंबंधी आपल्या प्रशासनाकडून एका चांगल्या बातमीची घोषणा करण्यात येईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

‘रोगनिवारण व औषधोपचार यांचा आदर ठेवत मी तुम्हाला सांगू इच्छितो की, पुढील काही आठवड्यांमध्ये आमच्याकडे सांगण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी असणार आहेत,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरुन अमेरिका पुढील दोन आठवड्यात काही महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

मॉर्डना कपंनीने करोनाविरोधात विकसित केलेल्या लसीची अंतिम टप्प्याची चाचणी अमेरिकेत सुरु होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. या टप्प्यात ३० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येणार आहे. मॉर्डना कंपनी ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राझेनेका आणि दोन अन्य चिनी कंपन्यांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली आहे. मॉडर्नासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या टप्प्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या टप्प्यातील निकालावर बरंच काही अवलंबून असेल. यामधून लसीची नेमकी परिणामकारकता, उपयोगिता सिद्ध होईल.

Read More  चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow