34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयडॉ. बाबासाहेबांना कॅनडात सन्मान

डॉ. बाबासाहेबांना कॅनडात सन्मान

एकमत ऑनलाईन

कोलंबिया : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची येत्या १४ एप्रिलला १३० वी जयंती साजरी होत आहे. केंद्र सरकारने या वर्षीपासून १४ एप्रिल या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, कॅनडातील एका प्रांतातही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल हा समता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये १४ एप्रिल रोजी सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातही १४ एप्रिल रोजी समता दिन साजरा करण्यात येणार आहे. समाजातील जातीव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारत मानवेताल समानतेची वागणूक मिळवून देण्यास डॉ. बाबासाहेबांनी मोठी लढाई लढली. भारतीय संविधानातून प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकारही मिळवून दिला. त्यामुळे, कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताने बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये एक पत्रही जोडले आहे, त्यानुसार कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतात १४ एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा होणार आहे.

आता घरापासूनच सामानाची जबाबदारी विमान कंपनीची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या