तेहरान : इराणमध्ये आज (शनिवार) पहाटे १.३२ च्या सुमारास जोरदार भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजण्यात आली. भूकंपानंतर सुमारे तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. यूएईमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
इराणी प्रसारमाध्यमांनी भूकंपाची तीव्रता ६.१ सांगितली. तर, युरोपियन भूमध्य भूकंप केंद्राने याची तीव्रता ६.० असल्याचे म्हटले. भूकंप १० किमी (6.21 मैल) खोलीवर होता. युएईच्या विविध भागांतील रहिवाशांनीही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले.