34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयबालपणी अधिक गोड खाल्ल्याने स्मृतीभ्रंशाचा रोग

बालपणी अधिक गोड खाल्ल्याने स्मृतीभ्रंशाचा रोग

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : आमचा बाळ गोड दिले की खूष होतो, असे बाळाचे कौतूक करताना आया थकत नसतात. मात्र हे कौतूक आता थांबविण्याची गरज आहे. कारण अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानूसार बालपणी अतिगोड खाल्ल्यास भावी काळात मुलांना विस्मृतीचा रोग होण्याची अधिक शक्यता असते, असे सिद्ध झाले आहे. ट्रांसलेशन सायकेट्री या संशोधनपत्रिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) या अमेरिकेतील आरोग्य विषयक संस्थेनूसार अमेरिकेच्या नागरिकांना गोड खाण्याची फार आवड आहे. अमेरिकेतील दोन तृतीयांश लोक दररोज एखादे तरी गोड पेय किंवा पदार्थ यांचे सेवन करतात. यूसीएलए, कनॉस्की व जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी अतिगोड खाण्याचे स्मृतीवर परिणाम यावर संशोधन केले आहे. त्यांना यूएससी डॉर्नसायफ कॉलेज ऑफ लेटर्स, आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स या संस्थेतील जीवशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक स्कॉट कनोस्की यांची मदत झाली. कनोस्की यांनी आहार व मेंदूची कार्यक्षमता यांच्यातील संबंधावर अनेक वर्ष अभ्यास केला आहे. त्यात त्यांचे ठाम मत आहे की गोड पदार्थांचे अधिक सेवन केल्याने स्मृतीभ्रंश होण्याचे प्रमाण वाढते. यूसीएलए, कनॉस्की व जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी हे कसे घडते,याचा मागोवा घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी काही उंदरांवर प्रयोग केले.

स्मृती कार्यरत ठेवण्यासाठी मेंदुला मायक्रोबायोम या घटकाची मदत होत असते. मात्र अति गोड खाण्याने मायक्रोबायोमच्या संख्या व रचनेत बदल होतात. परिणामी स्मृती जतन करुन ठेवण्याचे त्यांचे कार्य ते व्यवस्थित करु शकत नाहीत, असे या संशोधकांना आढळून आले आहे.

उंदरांच्या दोन गटांवर प्रयोग
प्रयोगादरम्यान संशोधकांनी एका गटातील उंदरांना सातत्याने गोड पेय पिण्यासाठी उपलब्ध केले. दुस-या गटातील उंदरांना केवळ साधे पाणी पिण्यास उपलब्ध करुन दिले. एक महिन्यानंतर त्यांना असे आढळून आले की, सतत गोड खाणा-या उंदरांच्या स्मृतीक्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला तर ज्या उंदरांनी केवळ पाण्याचे प्राशन केले त्यांच्या स्मृतीवर काहीच परिणाम झाला नाही.

स्मृती कशी तपासली?
प्रयोग कालावधीनंतर उंदरांची स्मृती क्षमता तपासण्यासाठी त्यांनी दोन पद्धतींचा वापर केला. पहिल्या पद्धतीत मेंदूच्या हिप्पोकॅपस या भागावरील स्मृतीची तपासणी करण्यात आली. दुस-या पद्धतीत मेंदूचा दुसरा भाग पेरिहाईनल कॉर्टेक्सवरील स्मृतीची तपासणी करण्यात आली. दोन्ही भागांवरील स्मृती क्षमता पाणी पिणा-या उंदरांमध्ये अधिक तर गोड पेय पिणा-या उंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात घटलेली दिसून आली.

कोरोना लसीसोबत सोन्याची नथ भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या