नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने चायनीज मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकले आहेत.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी सीबीआय देखील तपास करत आहे. मे महिन्यात ZTE Corp. आणि Vivo Mobile Communication Co. विरोधात वित्तीय अनियमितेसंदर्भात तपास करण्यात आला होता. त्यानंतर आज विवो आणि त्याच्याशी संबंधित देशभरातील ४४ ठिकाणी ईडीकडून छापेमारे करण्यात आली आहे.