24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home आंतरराष्ट्रीय चीनकडून ‘सुपर सोल्जर’च्या निर्मितीचे प्रयत्न

चीनकडून ‘सुपर सोल्जर’च्या निर्मितीचे प्रयत्न

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: चीनने त्यांच्या लष्करातील सैनिकांची जैविक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने काही चाचण्या केल्या आहेत. यातून, ‘सुपर सोल्जर’ तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा इशारा अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स’चे मावळते संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी दिला आहे. रॅटक्लिफ यांनी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये चीनकडून निर्माण होऊ शकणाºया धोक्याचे विश्लेषण केले आहे. चीनकडून अमेरिकेबरोबरच संपूर्ण जगाला मोठा धोका असल्याचे त्यांनी या लेखात म्हटले आहे.

रॅटक्लिफ यांनी या लेखात म्हटले आहे, की ‘चीनने सैनिकांची जैविक क्षमता वाढविण्याच्या या प्रयत्नात नैतिकतेचे कोणतेही बंधन पाळलेले नाही,याचे पुरावे ‘नॅशनल इंटेलिजन्स’ कडे आहेत, असे रॅटक्लिफ यांनी म्हटले आहे. रॅटक्लिफ यांनी या लेखामध्ये आणखीही चीनच्या कारवायांची माहिती नमूद केली आहे.

क्षमता वाढविण्यासाठी जनुकीय रचनेत बदल
एल्सा कानिया आणि विल्सन वॉर्नडीक यांनी गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या संशोधनामध्ये चीनकडून जनुकीय बदलांमध्ये रस वाढत असल्याचे म्हटले होते. ‘भविष्यातील युद्धांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे चीनच्या लष्करी संशोधकांकडून याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत,’ असे एल्सा कानिया यांनी म्हटले आहे. संशोधनामध्ये विज्ञानकथांमधील ‘सुपर सोल्जर’सारख्या संकल्पना प्रत्यक्षात विचारात घेतल्या आहेत. यामध्ये डीएनए किंवा जनुकीय रचनेमध्ये बदल करून मानवी क्षमता वाढू शकते, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

शरीराचे भाग स्वत: हून वाढविण्याची क्षमता
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’प्रमाणेच शरीराचे भाग, स्वत:हूनच वाढणारे अवयव यासारख्या गोष्टी भविष्यात अस्तित्वात असतील, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. मात्र, निसर्गाच्या विरोधात जाऊन मानवी शरीरामध्ये बदल करणे योग्य नाही, असे सांगून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ अशा संशोधनाला विरोध करतात.

पीओकेतील दोन अल्पवयीन मुलींची भारतात घुसखोरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या