22.9 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत फायझर, बायोएनटेकला आपात्कालीन मंजुरी

अमेरिकेत फायझर, बायोएनटेकला आपात्कालीन मंजुरी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : ब्रिटननंतर आता अमेरिकेनेही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे. सुरूवातीपासूनच अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसत आहे. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

अमेरिकेने कोरोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही १०० दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीने फायझरच्या कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. या मुद्दावर झालेली बैठक तब्बल आठ तास सुरु होती. बैठकीदरम्यान एफडीएच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी १७ विरूद्ध ४ मतांनी लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली.

२४ तासांत ३ हजार मृत्यू
गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत कोरोनामुळे ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली. हा घटनाक्रम संपूर्ण परिस्थिती अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे. आम्ही वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारी आहोत. अमेरिकेसमोर लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाचं आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली

पुणे महापालिकेच्या शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद महापौरांनी दिले आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या