21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकेत आणीबाणी!

श्रीलंकेत आणीबाणी!

एकमत ऑनलाईन

राष्ट्राध्यक्ष मालदिवला पसार; संतप्त नागरिकांची पंतप्रधान निवास्थानावर निदर्शने

कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करणा-या श्रीलंकेत आता आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे देश सोडून मालदीवला परागंदा झाले आहेत. राजपक्षे यांनी देश सोडल्याने नागरिकांचा संताप आणखी अनावर झाला असून राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. चकमकीत १२ जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणीची घोषणा केली.

राजधानी कोलंबोत हजारोंच्या संख्येने लोकांचा लोंढा संसद भवनाकडे येत आहे. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या. यामुळे हिंसाचार देखील वाढला आहे. दरम्यान दोन गटात झालेल्या संघर्षात १२ जण जखमी झाले.

गोताबायांना हवाई दलाची मदत : राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षा रक्षक यांना मालदीवला जाण्याची परवानगी दिली होती. यासाठी संरक्षण मंत्रालयाने सर्व गोष्टींची पूर्तता केली होती. बुधवारी सकाळी एअरफोर्सकडून त्यांना विमान उपलब्ध करून देण्यात आले. गोतबाया राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

नागरिकांसमोर शस्त्र समर्पण : राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर नागरिकांनी पंतप्रधानांकडे मोर्चा वळवला आहे. राजधानी कोलंबो येथील पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलक जमा झाले आहे. त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुरांचा वापर केला. मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी अखेर हवेत गोळीबार करण्याची वेळ आली. श्रीलंकेच्या लष्कराने नागरिकांसमोर शस्त्र खाली ठेवले.

भारताकडून खंडन : गोताबाय राजपक्षे भारताच्या मदतीने मालदीवमध्ये पळून गेले असल्याची अफवा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तालयाने तातडीने एक ट्वीट करत ही अफवा फेटाळून लावली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या