34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयजर्मनीत मराठी शाळेची स्थापना; फ्रँकफर्ट येथे मराठी कट्टा

जर्मनीत मराठी शाळेची स्थापना; फ्रँकफर्ट येथे मराठी कट्टा

एकमत ऑनलाईन

फ्रँकफर्ट : भारतातील लोकांना उच्च शिक्षणासाठी पूर्वी इंग्लंड व अमेरिकेचे आकर्षण होते. पण आता जर्मनीत उच्चशिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. याचे कारण जर्मनीत उत्तमोत्तम विश्वविद्यालये तर आहेतच पण तिथे शिकण्यासाठी विद्यार्थ्याला अत्यल्प फी भरावी लागते. तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळाल्यामुळे नोकरीही अपेक्षेप्रमाणे मिळते. जर्मनीचे हवामान इंग्लंडसारखेच असल्यामुळे भारतीयांना सुस होते. त्यामुळे भारताच्या कानाकोप-यातून कानडी, बंगाली, पंजाबी, तामिळ विद्यार्थी जसे जर्मनीत आले आहेत तसेच मराठी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत.

मराठी माणूस कोणत्याही देशात गेला आणि तेथील देशातील वातावरणाशी मिळते जुळते घेऊन राहायला लागला तरी आपली भाषा आणि संस्कृती टिकवून धरणे त्याला जरुरीचे वाटते. जर्मनीत स्थायिक झालेली मराठी माणसे देखील एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन सण उत्सव एकत्र साजरे करू लागली आहेत. अनेक ठिकाणी असे उत्साही गट निर्माण होताना पाहून फ्रँकफर्ट इंडियन कॉन्सुलेटने ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया’ असा ग्रुप तयार केला आणि मराठी, बंगाली, तामिळ अशा सर्व गटांना बोलावून, मिटिंग ठरवून, त्यांना अधिकृत नोंदणी करण्यास मदत देण्याचे कबूल केले. १९९० पासून तेथे स्थायिक झालेले रवी जठार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी या मींिटगनंतर मंडळ स्थापन करण्याचे ठरवले. मग आवश्यक ती कागदपत्रे जमवून मंडळाची नोंदणी केली.

२०१३-१४ मध्ये ही प्रक्रिया सुरु होती. २०१४ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाला नाव दिले मराठी मित्र मंडळ. हे जर्मनीतील पहिले मराठी मंडळ आहे. याचे अध्यक्ष झाले रवी जठार. पुढे पाच वर्षे आपल्या कारकिर्दीत मराठी सण, उत्सवांच्या निमित्ताने त्यांनी संक्रांत, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव, दिवाळी अशाअनेक कार्यक्रम आयोजित केले. २०२० मध्ये अध्यक्ष झालेले प्रसाद भालेराव यांनाही हीच परंपरा सुरु ठेवायची होती. परंतु २०२० मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे हे शक्य झाले नाही. दिवाळी पहाट कार्यक्रम ऑनलाईन करावा लागला. रवी जठार यांनी सांगितले, आमच्या पहिल्या मंडळाच्या स्थापनेनंतर स्फूर्ती घेऊन जर्मनीतील इतर प्रांतात मिळून ‘फ्रँकफर्ट मराठी कट्टा’, ‘म्युनिक मराठी मंडळ’, बर्लिन मराठी मंडळ’, हॅम्बुर्ग मराठी मंडळ’ ई. अकरा मराठी मंडळे स्थापन झाली आहेत. प्रत्येक मंडळात ५० ते १५० सभासद आहेत. सर्व मंडळे आपापल्या परीने मराठी भाषिकांना एकत्र आणून सर्व मराठी सण आणि मराठी भाषा दिन साजरा करतात. अशा त-हेने मराठी संस्कृतीचे जर्मनीत जतन करत आहेत.

२०१४ मध्ये झाली स्थापना
२०१४ च्या सुमारास फ्रँकफर्ट येथे मराठी कट्टा स्थापन झाला आहे. आसपासच्या गावातील मंडळीही येथील कार्यक्रमात सामील होतात. मराठमोळ्या कार्यक्रमांचा आणि खाद्य संस्कृतीचा आस्वाद हे याचे वैशिष्ट्य आहे. कधी मराठीजनांचे रेशीमबंधही येथे जुळतात. परिसरातील सभागृहाचा वापर करून हे मंडळ मराठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कट्ट्याचा वर्धापन दिनदेखील साजरा करतात. जुन्या आणि नवीन पिढीतील भाषेच्या फरकामुळे (मराठी आणि जर्मन) तेथे स्थायिक झालेली मराठी मंडळी अस्वस्थ होत होती. हा फरक नाहीसा करण्यासाठी मराठी शाळा स्थापन करण्याचा उपक्रमही हाती घेतला. तसेच वाचनालयही सुरु केले.

मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन
‘फ्रँकफर्टचा प्रसिद्ध मराठी गणपती’ फार उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दिवाळी संमेलनही थाटात होते. मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी या मंडळाने आणखी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे मराठी चित्रपट, चित्रपटगृहात दाखवणे. यातून मिळणारा नफा ते सत्कारणी लावतात. कधी महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत पाठवून तर कधी वेगवेगळ्या विषयांवर शिबिरे आयोजित करून. सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

देशात २४ तासांत तब्बल ८१ हजार ४६६ रुग्णांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या