34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअखेर पाकिस्तान भारतापुढे झुकला; व्यापारविषयक निर्बंध हटविणार

अखेर पाकिस्तान भारतापुढे झुकला; व्यापारविषयक निर्बंध हटविणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने कलम ३७० हटविल्यानंतर भारतातून व्यापा-यावर निर्बंध घालणा-या पाकिस्तानला अखेर पुन्हा भारतापुढे गुडघे टेकावे लागले आहेत. पाकिस्तानने भारतातून कापसाच्या आयातीसाठी व्यापारविषयक निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयानंतर आपला शेजारी पाकिस्तानला पोटदुखी सुरु झाली होती.

लगबगीने पाकिस्तानने भारताबरोबर व्यापारी संबंध तोडले होते.त्याचा भारताला काहीच फटका बसला नाही. मात्र यंदा पाकिस्तानलाच मोठा फटका बसला आहे. यंदा पाकिस्तानमध्ये नेहमीपेक्षा कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. दरवर्षी १२ दशलक्ष गाठींची गरज असलेल्या पाकिस्तानमध्ये यंदा मात्र केवळ ७.७ दशलक्ष गाठी एवढ्याच कापसाचे उत्पादन झाले आहे. परिणामी पाकिस्तानमधील रोजगाराचा सर्वात मोठा स्त्रोत असलेल्या वस्त्रोद्योगालाच घरघर लागली आहे. आधीच पाकिस्तानात उडालेला महागाईचा कहर त्यात बेरोजगारांची फौज निर्माण झाल्यास पाकिस्तानमध्ये अनागोंदी निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. ही जाणीव पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला झाली असून त्यांच्या वस्त्रोद्योगाला वाचविण्यासाठी त्यांनी भारताकडे पहायला सुरुवात केली आहे.

मात्र त्यांनीच टाकलेल्या व्यापारविषयक निर्बंधांचे बुमरँग त्यांच्यावरच उलटले असूून आधी हे निर्बंध हटवून भारताकडे कोरोना लसीप्रमाणेच कापसाचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्याची भुमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठे वृत्तपत्र दैनिक डॉनने यासंदर्भात वृत्त दिले असून वृत्तानूसार पाकिस्तान सरकारच्या कॅबिनेट आर्थिक समन्वय समितीला भारतावरील व्यापारविषयक निर्बंध हटविण्याची सूचना करण्यात आली आहे. काही दिवसांतच याबाबत अंतिक निर्णय होणार असून त्यानंतर पाकिस्तान भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करण्याची दाट शक्यता आहे.

भारताकडूनच आयात का?
पाकिस्तान कापसाची आयात अमेरिका, ब्राझील व उझबेकिस्तानकडून करीत आला आहे. मात्र ही आयात कमी प्रमाणात असायची. यंदा पाकिस्तानला कमीतकमी ५ दशलक्ष गाठींची आयात करावी लागणार असून त्यासाठी इतक्या लांबून आयात ही कमीतकमी दीड ते दोन महिने लागणारी व महाग पडणार आहे. दुसरीकडे भारताकडे मागणी नोंदविल्यास कमी वाहतुक खर्चात व केवळ ४ दिवसांत हा कापुस पाकिस्तानात पोचणार आहे.

नांदेडमध्ये घडले ते भयानक होते; कारवाई तर होणारच, अशोक चव्हाण यांचे स्पष्टोक्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या