21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीय२०२१ च्या सुरुवातीलाच रुग्णसंख्येचा विस्फोट?

२०२१ च्या सुरुवातीलाच रुग्णसंख्येचा विस्फोट?

एकमत ऑनलाईन

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्यूएचओ) नुकत्याच जारी केलेल्या एका इशा-यामध्ये युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचे म्हटले आहे. डब्यूएचओने नाताळ साजरा करताना लोकांनी मास्क घातले नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकते, असेही म्हटले आहे. लोकांनी नाताळानिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नवीन वर्षामध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळू शकते, असा धोक्याचा इशाराही डब्ल्यूएचओने दिला आहे.

डब्यूएचओने ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना नताळाच्या कालावधीमध्ये करोनासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल़ याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्याचे असोसिएट फ्री प्रेसने म्हटले आहे. नाताळाच्या कालावधीमध्ये किती लोकांनी एकत्र यावे यासाठी नियम करावेत, एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी होणार नाही हे पहावे असेही डब्यूएचओने या देशांना सांगितले आहे. नाताळानिमित्त कोणाला पार्टी करायची असल्यास मोकळी मैदाने, घराचे अंगण आणि उघड्या जागांना प्राधान्य द्यावे. बंद जागी अनेकांनी भेटणे धोकादायक ठरु शकते, असेही डब्यूएचओ आपल्या इशाºयामध्ये म्हटले आहे. हवा खेळती असणाºया ठिकाणांना प्राधान्य दिल्यास संसर्गाचा धोका कमी आहे, असेही डब्यूएचओने नमूद केले आहे.

सणाच्या वेळी काळजी घ्यावी
डब्यूएचओने लोकांनी नाताळ साजरा करण्यासंदर्भातील निर्णय गांभीर्याने घ्यावेत असाही सल्ला दिला आहे. तुमचे निर्णय या कठीण प्रसंगी महत्वाचे ठरणार असून सुट्ट्या आणि कुटुंबामधील सर्वजण एकत्र येताना अधिक काळजी घ्यावी असे डब्यूएचओने म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये सूट देण्याची मागणी
ब्रिटनममध्ये नाताळाच्या कालावधीमध्ये करोनासंदर्भातील निर्बंधांमध्ये सूट देण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नेत्यांनी तसेच अनेक बड्या चर्चेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांकडे निर्बंधांमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. लोकांना नाताळ मोकळेपणे साजरा करता यावा यासाठी सूट देण्याची मागणी केली जात आहे.

आता घरमालक, भाडेकरूंना कायदेशीर लढा देण्याची गरज नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या