24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट

हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट

एकमत ऑनलाईन

लाहौर : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये १५ जखमी, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका तीव्र होता की, लाहौरच्या जोहर टाऊन भागातील घरांच्या काचा फुटल्या, तर इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. जखमींना रुग्णालयात हालविण्यात आले आहे.

हाफिज सईद याच्या घरावरील हा पहिला हल्ला नाही, तर यापूर्वी त्याच्या घरावर हल्ला झालेला आहे. सध्या स्फोट कोणी केला असावा, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. या स्फोटाची तीव्रता जास्त होती, अशी माहिती समोर आलेली आहे.

घटनास्थळावरील एका व्यक्तीने असे सांगितले आहे की, एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी हाफिज सईद याच्या घराजवळ उभी केली होती. त्यानंतर थोड्याच वेळात स्फोट झाला. सध्या या जागेला पोलिसांनी पुढील तपासणी करण्यासाठी घेरलेले आहे.

सखोल चौकशीचे आदेश
पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदर यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. हाफिज सईदच्या घरासमोर झालेल्या स्फोटाची प्राथमिक माहिती अधिका-यांकडून घेतलेली आहे. पोलिसांनी सांगितले की, स्फोट नेमका कशामुळे झाला, हे आताच सांगता येणार नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या