25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्यांनी आज म्हणजेच, गुरुवारचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. एकिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे देशातील इंधन दरांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

महाराष्ट्र आणि मेघालय वगळता देशातील इतर राज्यांत तब्बल साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती ८ फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ९० डॉलर प्रति बॅरल खाली उतरल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती ८८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. ५ सप्टेंबर रोजी ओपेककडून मागणीत होत असलेली घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या सावटाच्या भीतीने ऑक्टोबरपासून उत्पादन १ लाख बॅरल प्रति दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तेलाचे भाव स्थिर करण्याचा ओपेकचा प्रयत्न सुरु आहे. मात्र कच्च्या तेलाच्या दरांत मोठी अस्थिरता दिसून येत आहे. ओपेकने घेतलेल्या निर्णयानंतर तेलाच्या किंमतीत मोठी उसळी आली. मात्र मागणीत घट होत असल्याने पुन्हा किंमती अस्थिर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, ओपेककडून उत्पादनात केलेली घट ही जागतिक बाजाराच्या तुलनेत ०.१ टक्के असल्याने येत्या काळात तेलाच्या दरांत फार मोठी उसळी पाहायला मिळणार नाही. मात्र तेलाच्या दरांत मोठी वाढ झाल्यास त्याचा परिणाम थेट भारतावर होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या