लंडन : ब्रिटनमध्ये महागाई गगनाला भिडली असून यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. वाढत्या महागाईमुळे सामान्यांसह शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फूड बँकेवर अवलंबून राहावे लागत आहे.
डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ मध्ये लोकांनी फूड बँकेकडून सर्वाधिक मदतीची मागणी केली. ब्रिटनमध्ये सुमारे १५४ संस्था फूड बँक चालवतात. या लोकांना मोफत अन्न वाटप करतात.
स्वतंत्र अन्न सहायता नेटवर्कने ९० टक्के फूड बँकांच्या आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. फूड बँक चालवणा-या ८५ संस्थांनी सांगितले की, जेव्हा अन्नाची मागणी करणा-यांची संख्या वाढली तेव्हा त्यांनी अनेकदा अन्नकपात केली आणि अन्नाची मागणी करणा-या अनेकांना परतही पाठवले.