23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

एकमत ऑनलाईन

फ्लोरिडा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार अ लागो रिसॉर्टवर एफबीआयने छापा टाकला.

एफबीआय अधिका-यांनी पाम बीचवर असलेल्या मार अ लागोवर छापा टाकून ते ताब्यात घेतले. असे सांगण्यात येते की, एफबीआय राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कागदपत्रांचा शोध घेत आहे, त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

फ्लोरिडा येथील ट्रम्प यांच्या पाम बीचवर असलेल्या घरावर एफबीआयने छापा टाकून ते घर अधिका-यांनी ताब्यात घेतले. एफबीआयने छापा टाकला, तेव्हा ट्रम्प फ्लोरिडामध्ये उपस्थित नव्हते.

अधिकारी ट्रम्प यांचे कार्यालय आणि वैयक्तिक निवासस्थानांवर लक्ष केंद्रित करून शोध घेत आहेत. त्याच वेळी, न्याय विभाग आणि व्हाईट हाऊसनं या प्रकरणी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात न्याय विभाग दोन प्रकरणांची चौकशी करत आहे.

२०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिले प्रकरण आणि कागदपत्रे हाताळण्यासंदर्भात दुसरे प्रकरण. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेने याप्रकरणी ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या