29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलसीमुळे रक्त गोठण्याची भीती; ऑक्सफर्डने लहान मुलांवरील चाचण्या थांबवल्या

लसीमुळे रक्त गोठण्याची भीती; ऑक्सफर्डने लहान मुलांवरील चाचण्या थांबवल्या

एकमत ऑनलाईन

लंडन : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मंगळवारी सांगितले की, ऍस्ट्राझेनेकाद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोविड लसीची लहान मुलांवरील चाचणी थांबवण्यात आली आहे. या लसीमुळे प्रौढ नागरिकांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याच्या तक्रारींनंतर लहान मुलांवरील चाचणी थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एका निवेदनात म्हटले की, चाचणीत ही लस पूर्णपणे सुरक्षित नाहीये. रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यास सुरू करण्यापूर्वी ब्रिटनमधील मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट्स नियामक (टऌफअ) कडून अतिरिक्त डेटा येण्याची प्रतिक्षा आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पालक आणि मुलांनी चाचणीच्या वेळापत्रकानुसार यावे आणि काही प्रश्न असल्यास ते चाचणीच्या ठिकाणी विचारू शकतात. एमएचआरए ही संस्था ऍस्ट्राझेनेकाच्या डेटाचे विश्लेषण करणारी संस्था आहे. जगातील ब-याच आरोग्य एजन्सीचे लक्ष सध्या ऍस्ट्राझेनेकाच्या लसीमधून रक्ताच्या गाठी तयार होत आहेत की नाही याकडे आहे. सुरुवातीला नॉर्वे आणि युरोपमधून अशा अनेक तक्रारी समोर आल्या. लसीकरणानंतर नागरिकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या.

यूकेमध्ये चिंता वाढविली
अहवालानंतर यूकेमध्ये एकूण १.८० लाख लसींपैकी ३० प्रकरणांत रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी सात चिंताजनक आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने मंगळवारी सांगितले की, अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाही आणि आढावा घेण्यात येत आहे. युरोपियन युनियनच्या आरोग्य आयुक्त स्टेला म्हणाल्या, एजन्सी बुधवार रात्री उशिरापर्यंत निर्णय घेऊ शकते. त्यांनी सांगितले की, त्या ईएमएच्या संपर्कात आहेत.

पंतप्रधानांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या