26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअधिक तास काम केल्याने प्राण गमवण्याची भीती

अधिक तास काम केल्याने प्राण गमवण्याची भीती

एकमत ऑनलाईन

जिनिव्हा: अधिक वेळ ऑफिसमध्ये अथवा घरातून ऑफिसचे काम करणे हे जीवावर बेतण्याचा धोका आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या एका अहवालात हा धोक्याचा इशारा दिला आहे. अधिक वेळ काम करत असल्यामुळे लोकांना प्राण गमवावे लागत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना महासाथीच्या आजारामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी, मित्रांच्या गाठीभेठी घेण्यापासून ऑफिसचे काम करण्याची पद्धतही बदलून गेली आहे. वर्क फ्रॉम होम मुळे अधिक वेळ काम केले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, अधिक वेळ काम करत असल्याने दरवर्षी शेकडो जणांचा मृत्यू होत आहे. कोरोना महासाथीच्या काळात हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने संयुक्तपणे १९४ देशांचा अभ्यास केला. त्यानुसार, दर आठवड्याला ३५ ते ४० तास काम करण्याच्या तुलनेत ५५ तास अथवा अधिक वेळ काम करणा-यांना ३५ टक्के अधिक स्ट्रोकचा धोका असतो, असे अहवालात नमूद केले आहे.

आठवड्यात ५५ तासांपेक्षा अधिक काम नको
जागतिक आरोग्य संघटनेच्या पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि आरोग्य विभागाच्या संचालिका मारिया नीरा यांनी सांगितले की, आठवड्यात ५५ तास अथवा त्याहून अधिक वेळ काम करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. अशा प्रकारे अधिक काम करणा-या लोकांमध्ये सामान्य काळ काम करणा-यांपेक्षा १७ टक्के अधिक प्राण गमावण्याचा धोका आहे, असेही म्हटले आहे.

चीन, जपान, ऑस्ट्रेलियात अधिक प्रमाण
अधिक वेळ काम करण्याच्या दुष्प्रभावामुळे चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया अधिक प्रभावित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

केदारनाथ धामची कवाडे उघडली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या