23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन?

पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचे निधन?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना दुबईत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुशर्रफ यांची गेल्या अनेक काळापासून तब्येत खराब होती. त्यांना गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. गेल्या अनेक काळापासून तब्येत खराब होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मुशर्रफ यांचे वयाच्या ७८ वर्षी निधन झाल्याचे वृत्त आहे.

२००१ ते २००८ या कालखंडात ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. त्यापूर्वी ते पाकिस्तानी लष्कराचे प्रमुखही होते. कारगील युद्धाला परवेझ मुशर्रफ हेच जबाबदार होते, असा आरोप अनेकदा त्यांच्यावर करण्यात आला. त्यांनी नवाज शरीफ यांना सत्तेतून पायउतारही केले होते. १९९९ साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना पाक्स्तिानी सैन्याला भारताकडून पराभव व्हावे लागले होते. यावरून तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर १२ ऑक्टोबर १९९९ साली नवाझ शरीफ यांनी मुशर्रफ यांना लष्करप्रमुखपदावरून पदच्युत केले होते. हे वृत्त कळताच मुशर्रफ यांनी शरीफ यांच्याविरोधात लष्करी बंड केले आणि सत्ता ताब्यात घेतली. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफ यांनी पाकिस्तानात आणीबाणी लागू केली होती. त्यानंतर त्यांनी स्वताला राष्ट्रपती म्हणून जाहीर कले. नवाज शरीफ यांना अटकेत टाकले आणि त्यांना देश सोडण्यास भाग पाडले.

२००१ साली विवादीत जनमताच्या आधाराने ते पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले. २००७ सालापर्यंत त्यांच्याविरोधात जनमत तयार झाले होते. डिसेंबर २००७ मध्ये बेनझीर भुट्टो यांची हत्या झाल्यानंतर, १८ ऑगस्ट २००८ रोजी मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि लंडनला पलायन केले होते. पुढे ४ वर्षे लंडनमध्ये राहून ते पुन्हा पाकिस्तानात परतले होते. तालिबानने मुशर्रफ यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांच्याविरोधात देशद्रोह आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर हा खटलाही चालला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या