22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeआंतरराष्ट्रीयमाजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन

माजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन

एकमत ऑनलाईन

व्हेटिकन सिटी : व्हेटिकन सिटीचे माजी पोप बेनेडिक्ट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज, स्थानिक वेळ सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी २०१३ मध्ये ख्रिश्चन धर्मगुरुंचे सर्वोच्च पद समजल्या जाणाऱ्या पोप पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी ते व्हॅटिकन गार्डनमधील एका लहान मठ मेटर एक्लेसियामध्ये वास्तव्य करत होते. बेनेडिक्ट १६ वे यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. व्हेटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस यांनी सांगितले की, माजी पोप बेनेडिक्ट १६ वे त्यांना भेटण्यासाठी येत असे. बेनेडिक्ट यांच्या वाढत्या वयानुसार, त्यांची प्रकृती ढासळत होती. बुधवारी पोप फ्रान्सिस यांनी बेनेडिक्ट १६ वे यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.

बेनेडिक्ट १६ वे यांचा जन्म जर्मनीत झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव जोसेफ रॅत्झिंगर होते. बेनेडिक्ट यांना २००५ मध्ये व्हेटिकन सिटीचे पोप म्हणून निवडण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे वय ७८ वर्ष होते. सर्वाधिक वय असणाऱ्या पोप पैकी एक होते. जवळपास आठ वर्ष ते रोमन कॅथलिक चर्चचे पोप होते. वर्ष २०१३ मध्ये त्यांनी स्वेच्छेनुसार पोप पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या