22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमाजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेत परतले

माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे श्रीलंकेत परतले

एकमत ऑनलाईन

कोलंबो : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे शुक्रवारी थायलंडहून मायदेशी परतले आहेत. याआधी शनिवारी सकाळी ते श्रीलंकेला परतल्याची बातमी आली होती. आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत दोन महिन्यांपूर्वी गोटाबाया यांच्या सरकारविरोधातील निदर्शने तीव्र झाल्यानंतर ७३ वर्षीय राजपक्षे यांनी १३ जुलै रोजी देश सोडून पळ काढला होता.

श्रीलंका इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सध्या सामना करत आहे. खाद्यपदार्थांपासून ते इंधनापर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या