26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeआंतरराष्ट्रीयव्हिएतनामच्या ‘बंटी-बबली’कडे सापडली ४५ पिस्तुले

व्हिएतनामच्या ‘बंटी-बबली’कडे सापडली ४५ पिस्तुले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : व्हिएतनाममधून दिल्ली विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून एक दोन नव्हे तर, तब्बल ४५ पिस्तुले जप्त करण्यात आलीे. या कारवाईनंतर एका भारतीय जोडप्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती इंदिरा गांधी विमानतळ अधिका-यांनी दिली आहे.

व्हिएतनामहून आलेल्या एका भारतीय जोडप्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन ट्रॉली बॅगमधून २२ लाखांहून अधिक किमतीची ४५ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. आरोपींनी यापूर्वी १२ लाखांहून अधिक किमतीच्या २५ पिस्तुलांच्या तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तुले बॅगेत भरलेली पाहून विमानतळावरील अधिकारीही काही काळ चक्रावून गेले. या कारवाईनंतर संबंधित जोडप्याकडील बॅग जप्त करण्यात आली असून, ही शस्त्रे कोणाकडे पोहोचवण्यात येणाप होती याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या