21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयस्कॉटलँडमध्ये महिलांना मोफत सुविधा

स्कॉटलँडमध्ये महिलांना मोफत सुविधा

एकमत ऑनलाईन

लंडन : देशाची प्रगती होण्यासाठी देशातील सगळया स्तरांवर लक्ष देणे गरजेचे असते. महिलांचे शिक्षण, प्रशिक्षण, सशक्तीकरण आणि आरोग्याच्या समस्यांवर देशाच्या प्रगतीची टक्केवारी अवलंबून असते. देशातील महिलांच्या समस्या लक्षात घेता त्यातील एका महत्वाच्या विषयावर आता स्कॉटलंड शासनाने नवे पाऊल उचलले आहे.

आता स्कॉटलंडमध्ये महिलांना सॅनिटरी पॅड मोफत मिळणार आहेत. स्कॉटलंडमधील सार्वजनिक सुविधांमध्ये सर्व विनामूल्य उपलब्ध करून दिली जातील. हा नवा कायदा स्कॉटीश खासदारांनी २०२० मध्ये एकमताने मंजूर केला होता. अति गरीब, दारिर्द्य रेषेखाली मोडणा-या महिलांना मासिक पाळीत होणारे त्रास आणि पैशाअभावी सॅनिटरी पॅडचा वापर करत नसलेल्या महिलांची परिस्थिती लक्षात घेता स्कॉटलंड शासनाने एक चांगले पाऊल उचललेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या