22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनिवडून आल्यास मोफत लस - जो बायडेन यांचे अमेरिकन नागरिकांना आश्वासन

निवडून आल्यास मोफत लस – जो बायडेन यांचे अमेरिकन नागरिकांना आश्वासन

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार जो बायडेन यांनी आपण निवडून आलो़ तर मोफत कोरोनाची लस देण्यात येईल, असे सांगितले आहे. कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी हे एक राष्ट्रीय योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जेंव्हा कोरोना व्हायरसवरील सुरक्षित आणि उपयोगी अशी लस येईल़ तेव्हा अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीचा विमा नसेल त्याला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचे बिडेन यांनी सांगितले. जर मी निवडणूक जिंकलो तर कोरोनासोबत लढण्यावर सगळे लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बायडेन यांनी एका प्रचार सभेत जनतेसोबत संवाद साधताना हे आश्वासन दिले आहे. शुक्रवारी अध्यक्षीय पदासाठीच्या अंतिम चर्चेदरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या काही आठवड्यांत कोरोनावरील लस जाहीर केली जाईल असा दावा केला होता. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. जो बायडेन यांनी प्रचारसभेत याच मुद्यांच्या आधारे ट्रम्प प्रशासनावर टीका केली आहे.

अमेरिकेत ३ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रचाराने वेग पकडला आहे. आम्ही आठ महिन्यांहून अधिक कोरोना विरोधात लढा देत आहोत आणि आतापर्यंत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी कोणतीही योजना आणलेली नाही. त्यांनी हार पत्करली आहे, असे बायडेन म्हणाले.

केंद्र सरकारचा कर्जदारांना मोठा दिलासा; मॉरेटेरिअम काळातील चक्रवाढ व्याजाचर रक्कम मिळणार परत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या