कोलंबो : श्रीलंकेत इंधन टंचाईमुळे स्थिती ढासळत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी लोकांना रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. कोलंबोत एका पंपावर इंधनासाठी रांगेत उभे असलेल्या एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला.
श्रीलंकेची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यांपासून ढासळली आहे. इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सहा महिन्यापूर्वी गॅससाठी रांगेत उभ्या असलेल्या एका ६४ वर्षीय नागरिकाचा गॅस स्टेशनवर मृत्यू झाला होता. दरम्यान, इंधनाच्या टंचाईमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
रेल्वे विभागाची सेवा देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक संकटामुळे खाद्यान्न, औषधी, स्वयंपाकाचा गॅस, इंधन, टॉयलेट पेपर एवढेच नाही तर काडीपेटीसारख्या आवश्यक वस्तूंची देखील टंचाई निर्माण झाली आहे.