22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेनसाठी आता जी-७ एकवटले

युक्रेनसाठी आता जी-७ एकवटले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगातील सात सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या नेत्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी व्हिडिओ लिंकद्वारे चर्चा केली आणि रशियन तेलाच्या किमती रोखून, रशियन वस्तूंवर शुल्क वाढवून युक्रेनच्या पुनर्बांधणीत मदत करण्याचे वचन दिले. आणि नवीन निर्बंध लादण्याचा इरादा व्यक्त केला.

रशियाविरुद्धच्या युद्धात मदत करण्यासाठी अमेरिका युक्रेनला पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्याची घोषणा करणार आहे. यासह, जी-७ नेते रशियावर काही नवीन निर्बंधांची घोषणा करू शकतात.

तीन दिवसांच्या शिखर परिषदेच्या अंतिम टप्प्यात रशियन तेलाच्या किंमती आणि रशियन अर्थव्यवस्थेला लक्ष््य करर्णा­या निर्बंधांवर बोलणी सुरू आहेत. जी-७ अर्थमंत्री या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत.

अमेरिकेने रशियामधून आयात होणा-या ५७० प्रकारच्या उत्पादनांवर नवीन शुल्कही जाहीर केले आहे. यासोबतच रशियाच्या संरक्षण पुरवठ्याला लक्ष््य करण्यासाठी इतर निर्बंधही लादले जाणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या