23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजीनिव्हामध्ये ‘गंगावतरण’

जीनिव्हामध्ये ‘गंगावतरण’

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : यंदाची जागतिक व्यापार संघटनेची (डब्ल्यूटीओ) जीनिव्हा मंत्रिपरिषद मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली. शेती, मत्स्य व्यवसाय, कोविड लससंदर्भातील पेटंट इत्यादी महत्त्वाच्या विषयांमुळे परिषदेला वेगळे महत्त्व होते.

परिषद चालू असतानाही काही अशा घडामोडी झाल्या ज्याला प्रसिद्धी मिळाली, परंतु वाच्यताच झाली नाही. त्यातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे भारताच्या गोमुख गंगाजलचे जीआय नोंदणी करण्यासंदर्भातले जाहीर सादरीकरण.

परिषदेच्या दुस-याच दिवशी पुण्याच्या ‘जीएमजीसी’ संस्थेतर्फे गोमुख गंगाजल ‘जीआय’बद्दल सादरीकरण करण्यात आले. तिथे भारतीय माध्यमांनी याची दखल घेतली व त्याची बातमी वा-यासारखी पसरली. ती भारताचे अस्तित्व दाखवण्यास कारणीभूत ठरली, नव्हे तर हिमालयातील गंगेने जीनिव्हात भारताच्या बाजूने अवतरण केले अशी अनुभूति आली.

थोडक्यात मेक्सिकोने डब्ल्यूटीओच्या मंत्री परिषदेचे संधीत रूपांतर करीत जगभरात टकीला पोहोचवला. त्याच धर्तीवर भारतातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ जगभरात पोहोचविण्याचे उद्दिष्ट ‘जीएमजीसी’ने ठरवले आणि त्या अनुषंगाने गोमुख गंगाजल जीनिव्हामध्ये प्रसारित केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या