Thursday, September 28, 2023

गँगस्टर अमरप्रीत समराची कॅनडात हत्या

जालंधर : कॅनडातील टॉप-१० गुंडांपैकी एक असलेल्या अमरप्रीत समरा उर्फ चक्कीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अमरप्रीत लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी व्हँकुव्हरला आला होता. रात्री जेवण आणि डान्स केल्यानंतर फ्रेझरव् ू हॉलच्या बाहेर येताच ब्रदर्स कीपर्स ग्रुपच्या गुंडांनी गोळीबार केला.

कॅनडाच्या वेळेनुसार रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अमरप्रीत त्याचा भाऊ रवींद्रसोबत लग्न समारंभासाठी आला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी हल्लेखोरांनी त्याच्या वाहनालाही आग लावली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मशीनगनमधून गोळीबार होत असल्याचा आवाज त्यांना ऐकू येत होता.

यूएन यादीत नाव
अमरप्रीत सिंग समरा उर्फ चक्कीचा संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) टॉप-१० गुंडांच्या यादीत समावेश होता. त्याचे प्रतिस्पर्धी ब्रदर्स कीपर्स गटामध्ये व्यवसायावरून वैमनस्य होते. लग्न समारंभाला उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, हल्लेखोर आधीच लग्न समारंभाच्या ठिकाणी फिरत असल्याची त्यांना माहितीही नव्हती. ही हत्या टार्गेट किलिंग मानली जात आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या