22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयइम्रान खान यांनी केला गिफ्ट घोटाळा?

इम्रान खान यांनी केला गिफ्ट घोटाळा?

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : नव्या पाकिस्तानचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांनी देशाला अधिक गरीब बनवले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान इम्रान खान परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू विकून आपली संपत्ती वाढवत आहेत. पाकिस्तानच्या मुख्य विरोधी पक्षांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंच्या प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अडकले आहेत.

पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्या वस्तू विकून देशाच्या सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम यांनी परदेशी भेटवस्तूंवरून इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे आणि म्हटले आहे की, इम्रान खान यांनी भेटवस्तू लुटल्या आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्या, ज्यात एक दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या महागड्या घड्याळाचा समावेश आहे असे पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या