किव : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता जवळपास चार महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. या युद्धाची तीव्रता कमी होण्याचे नावच घेत नाही.
अशातच आता या युद्धात एका बकरीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या बकरीमुळे रशियाचे ४० सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर या बकरीला गोट ऑफ कीव असे संबोधले जाते.
या बकरीला गोट ऑफ कीव म्हणण्याचे कारण म्हणजे युक्रेनचा गुप्तचर यंत्रणेचा पायलट घोस्ट ऑफ कीव. त्याने युद्धादरम्यान रशियाच्या विमानांवर हल्ला चढवत हरवले होते. या बकरीआधी एका कुत्र्यानेही युक्रेनला रशियाविरोधातल्या युद्धात मदत केली आहे.
याआधी जॅक रसल या कुत्र्याने युद्धादरम्यान २०० हून अधिक स्फोटके शोधून काढत युक्रेनी सैन्याची मदत केली होती.