26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीय‘गॉडफादर’ फेम जेम्स कान कालवश

‘गॉडफादर’ फेम जेम्स कान कालवश

एकमत ऑनलाईन

जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये ज्या चित्रपटाने मोठा इतिहास घडवला त्या ‘गॉडफादर’ चित्रपटाच्या वेगवेगळ्या आठवणींना नेहमीच उजाळा दिला जातो. जगभरातील चित्रपटाचे क्रमिक शिक्षण देणा-या संस्थामध्ये या चित्रपटाची पारायणे विद्यार्थी करतात. गॉडफादरबद्दल आज पुन्हा एवढ्या अगत्यानं सांगायचे कारण म्हणजे या चित्रपटातील अभिनेते जेम्स कान यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जेम्स यांनी सर्वोत्तम भूमिका केलेल्या चित्रपटांची नावे सांगायची झाल्यास, काउंटडाऊन, द रेन पीपल, फनी लेडी, गॉडफादर याशिवाय मिसरी, एल्फ, चोर, गॉडफादर पार्ट -२ यामध्ये त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या