25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयगोगरा, हॉट स्प्रिंग सोडणार नाही; चीनचा आडमुठपणा

गोगरा, हॉट स्प्रिंग सोडणार नाही; चीनचा आडमुठपणा

एकमत ऑनलाईन

बीजिंग: चीन आणि भारतादरम्यान लडाख पूर्वमधील सीमातणाव अनेक महिने कायम होता. त्यानंतर कमांडर स्तरीय चर्चेत तोडगा निघून दोन्ही देशांनी पुर्वी जशी स्थिती होती, तशीच ठेवण्यास सहमती दाखवली. मात्र चीनने पुन्हा आडमुठपणा दाखवला असून लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागातून सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर भारताने जेवढे मिळाले आहे, त्यात समाधानी रहावे अशी मग्रुरीची भाषाही चीनने केली आहे.

९ एप्रिल रोजी झालेल्या ११ व्या कमांडर स्तरावरील चर्चेत चीनने हॉट स्प्रिंग, डेपसांग मैदान आणि गोगरा पोस्टमधून माघार घेण्यास नकार दिला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यांनी पँगांग सरोवर आणि कैलास रेंजमधून माघार घेतली होती. त्याशिवाय इतर वादग्रस्त ठिकाणांबाबतही चर्चा करण्यास सहमती झाली होती.

चीनने पहिल्यांदा हॉट स्प्रिंगच्या पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि पीपी-१७ ए आणि गोगरा पोस्टवरून माघार घेण्याबाबत सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. भारताला जेवढे मिळाले आहे, त्यात त्याने समाधानी असले पाहिजे असे चीनने म्हटले आहे,असे भारतीय उच्च अधिकारी स्तरीय सुत्रांनी सांगितले आहे. पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि पीपी-१७ ए वर चिनी सैन्याने पलटण स्तरावरील सैन्य तैनात केले आहेत. भारतीय सैन्याच्या एका पलटणीत ३० ते ३२ जवान असतात. तर, लष्कराच्या एका कंपनीत १०० ते १२० जवान असतात.

भागात ये-जा करण्यासाठी रस्त्यांची आवश्यकता नाही. चिनी सैन्य वेगाने जलदपणे ये-जा करते. त्याशिवाय त्यांनी भारतीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली आहे. मागील दोन ते तीन वर्षात भारत अद्यापही पँगाँग सरोवर फिंगर आठपर्यंत कधीही गेले नाही. डेपसांगमध्ये भारतीय सैन्य आपल्या पारंपरीक हद्दीत वर्ष २०१३ पासून आतापर्यंत या भागात दाखल झाले नाही. चिनी सैन्याकडून भारतीय सैन्याला या भागात गस्त घालण्यास अटकाव केला जात आहे, असेही या सुत्रांनी सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सचा हैदराबादवर १३ धावांनी विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या