27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयखुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

एकमत ऑनलाईन

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने मिळून विकसित केलेल्या लशीचे डोस इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यापासून देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

जगभरात कोरोनाने कहर माजविला होता. युरोपियन देश व अमेरिकेत पहिल्या लाटेचा अंत झाल्यानंतर सुरु झालेल्या अनलॉकमुळे पुन्हा दुसरी लाट आली आहे. दुस-या लाटेतही रोज लाखो रुग्ण सापडत आहेत. दुसरीकडे सध्या भारतातील कोरोनाचा संसर्ग संपण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना थंडीत येणा-या दुस-या लाटेपासून सावधान रहाण्याच्या सुचना अनेक जागतिक संघटनांनी दिल्यामुळे ही दिवसांपुर्वी थोड्याशा आनंदात आलेले भारतीय जनमानसही चिंतत पडले होते.

संपुर्ण मानव जात कोरोनाच्या दहशतीमध्ये असताना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका ने विकसित केलेल्या लशीची पहिली खेप लवकरच मिळणार आहे. पहिली खेप स्वीकारण्यासाठी तयार रहा, असे अस्त्राझेनेकाकडून लंडनमधील महत्त्वाच्या रुग्णालयातील कर्मचा-यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील कोरोनाची दहशत आता संपण्यास सुरुवात होईल असे म्हणण्यास जागा आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात लाखो लोकांनी प्राण गमावले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचेही प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. नोक-या व रोजगार गेल्यानेही जगभरातील लोक चिंताग्रस्त झाले आहेत. लोकांची जीवन जगण्याची पद्धतच या कोरोनामुळे बदलून गेली आहे.

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी खात्रीशीर उपाय म्हणून लसनिर्मितीकड पाहिले जात होते. अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरु असून अनेकांच्या लसी मानवी चाचण्यांच्या दुस-या -तिस-या टप्प्यात आहेत. कधी एका कंपनीची लस फेल गेली तर कधी एका लशीचे दुष्परिणाम दिसून आले अशा बातम्यांनी लोकांना आशा-निराशेच्या हेलकाव्यात टाकले होते. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीचे नाव ए झेड डी १२२२ किंवा सीएचए डॉक्स १ एन कोव १९ असे आहे. ऑक्सफर्डने अस्त्राझेनेका या कंपनीबरोबर लशीच्या मानवी चाचण्या व व्यावसायिक उत्पादनाचे करार केले आहेत. इंग्लंडमध्ये तीनही टप्प्यातील मानवी चाचण्या यशस्वीरित्या पुर्ण झाल्यानंतर आता त्यांचे वितरण सुरु होणार आहे. द सन न्यूज पेपरने हे वृत्त दिले आहे. येत्या दोन नोव्हेंबरपासून लसींचा वापर सुरु करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

सीरम कडून कोविशिल्ड नावाने उपलब्ध
अस्त्राझेनेकाने नंतर जगातील वेगवेगळया कंपन्या आणि सरकारांबरोबर लशीचा पुरवठा आणि उत्पादनाचे करार केले. भारतात सिरम इन्स्टिट्यूट या लशीचे ‘कोविशिल्ड’ या नावाने उत्पादन करत आहे.

लसीमुळे वर्षभर कोरोनापासून संरक्षण
जगातील अनेक देशात ऑक्सफर्डची लस मानवी चाचणीच्या तिस-या टप्प्यात आहे. वर्षभर या लशीपासून संरक्षण मिळू शकते असे जून महिन्यात कंपनीच्या सीईओंनी म्हटले होते. लस दिल्यानंतर वयोवृद्ध व्यक्तींमध्येही मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इंग्लंड, भारतच नाही तर ब्राझील, अमेरिका या देशातही ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या सुरु आहेत. मान्यता मिळाल्यानंतर जगातील बहुतांश देशांमध्ये ही लस उपलब्ध होणार आहे.

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या