24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयगुगलनेही वाहिली राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रध्दांजली

गुगलनेही वाहिली राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रध्दांजली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांने सर्व क्षेत्रातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. तर एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतानंही दु:ख व्यक्त केले आहे. भारताने एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिलेत. भारताच्या गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला.

आज संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आदरांजली वाहिली आहे, गूगलने राखाडी रंगाचा लोगो करून इंग्लंडच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी तयार केला आहे. गूगलचे मुख्य कार्यकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले की, अनेक वृत्तपत्रांनी राणीचे वर्णन एकत्रित शक्ती म्हणून केले आहे. ज्यांनी अनेक दशके होणा-या बदलांमध्ये एक स्थिर व स्थान मिळवले होते. गुगलने राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या महान कारकिर्दीसाठी गुगलने त्यांच्या लोगोचा रंग राखाडी केला आहे. यापूर्वी ही माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू यांच्या निधनानंतर, २०१८ मध्ये बुशच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, लोगो राखाडी ठेवण्यात आला होता. गुगल देशातील बदलत्या घडामोडींन नुसार लोगोमध्ये बदल करत असते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या