25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीयफेसबुकनंतर ‘गुगल’ची कर्मचारी भरतीला स्थगिती

फेसबुकनंतर ‘गुगल’ची कर्मचारी भरतीला स्थगिती

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : जगातील आर्थिक मंदीची भीती आता गुगललाही सतावू लागलीय. आता वर्ष २०२२ च्या उरलेल्या दिवसांसाठी भरती प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतलाय. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मंगळवारी कंपनीच्या कर्मचा-यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये या निर्णयाची माहिती दिलीय.

सुंदर पिचाई यांनी एका ईमेलमध्ये म्हटले की, २०२२ आणि २०२३ मध्ये कंपनीचे लक्ष केवळ अभियांत्रिकी, तांत्रिक तज्ञ आणि महत्त्वाच्या पदांवर कर्मचारी भरती करण्यावर आहे. २०२२ च्या पहिल्या टप्प्यात कंपनीने कर्मचा-यांंच्या भरतीचा कोटा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता आपल्याला यशासाठी अधिक प्रयत्न करणे आवश््यक असल्याचे पिचाई यांनी म्हटले.

पिचाई म्हणाले, २०२२ आणि २०२३ मध्ये कंपनीचे लक्ष अभियांत्रिकी, तांत्रिक आणि इतर अत्यावश््यक सेवांमध्ये कर्मचारी भरती करण्यावर असेल. दुस-या तिमाहीतच आम्ही १०,००० कर्मचारी गुगलमध्ये जोडले आहेत. तिस-या तिमाहीत कर्मचा-यांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. मात्र, आम्ही यावर्षी भरतीचे लक्ष््य जवळपास पूर्ण केल आहे, त्यामुळे या वर्षातील उर्वरित दिवस आम्ही भरती प्रक्रिया बंद करत आहोत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या