कदरसूल : बांगला देशमधील कंटेनर डेपोला भीषण आग लागली आहे. या घटनेमध्ये आत्तापर्यंत जवळपास ४० जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, बांगला देशातील एका खाजगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री चटगावमधील सीताकुंडा उपजिल्ह्यातील कदमरसूल परिसरात ही घटना घडली. येथील एका बीएम कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागली. या आगीत होरपळून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, कंटेनर डेपोमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर काही स्फोट झाले. यामध्ये ४० जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. यामध्ये काही पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांचा देखील समावेश आहे. ढाका ट्रिब्यूनने रेड क्रेसेंट यूथ चटगांवचे आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्ताकुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ४५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी किमान ३५० लोक सीएमसीएचमध्ये आहेत.