21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home आंतरराष्ट्रीय लसीच्या माहितीवर हॅकर्सची नजर

लसीच्या माहितीवर हॅकर्सची नजर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयबीएम या टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनीने कोव्हीड -१९ च्या लसीवर हॅकर्सनी कडक नजर ठेवण्यास सुरुवात केल्याबाबत सतर्क केले आहे. कोविड -१९ लसीचे वितरण करणा-या कंपन्यांवर या हॅकर्सची नजर आहे. आयबीएमला असे संकेत मिळाले आहेत की, आता जगभरातील लोकांमध्ये कोरोना विषाणूची लस पोहचवण्याकडे हॅकर्सचे लक्ष केंद्रित केले गेले आहे. आयबीएमने गुरुवारी ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत शंका व्यक्त केली आहे. आयबीएमने म्हटले आहे की कोविड -१९ लस संबंधित कंपन्या आणि संस्थांवर लक्ष केंद्रित करणा-या ‘ग्लोबल फिशिंग मोहिमे’बद्दल त्यांना माहिती मिळाली आहे. यूएस सायबरसिक्योरिटी ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सीनेही हा रिपोर्ट रिपोस्ट केला आहे.

हे हॅकर्स लस वितरणासाठी वापरल्या जार्णा­या ‘कोल्ड चेन’ वर लक्ष ठेवून आहेत. तयार करत असलेल्या लसीच्या वितरणासाठी कोल्ड चेनशी संबंधित मूलभूत माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे. ही लस -७० डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवली जाते जेणेकरून ती खराब होणार नाही.
आयबीएमचे म्हणणे आहे की, हे हॅकर्स वापरल्या जाणा-या मॉडेल, किंमती आणि इतर बाबींची माहिती गोळा करीत आहेत. कंपनीद्वारे वापरल्या जाणा-या रेफ्रिजरेशन युनिटची माहितीही यात समाविष्ट केली आहे. असे मानले जाते की ही मोहीम तयार करणा-या व्यक्तीस लस देण्यासाठी पुरवठा साखळीत कोणत्या वस्तू आवश्यक आहेत, याबद्दल विशिष्ट माहिती आहे.

इतर कंपन्यांकडूनही माहिती गोळा करीत आहे
आयबीएमने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, या हॅकर्सच्या इतर लक्ष्यांमध्ये सौर पॅनेल तयार करर्णा­या कंपन्यांचाही समावेश आहे. या उत्पादकांच्या मदतीने लस रेफ्रिजरेटर्स पॉवर देण्यास तयार आहेत. याशिवाय हे हॅकर्स ड्राय आईस बनवणा-या पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्सही माहिती गोळा करीत आहेत.

चिनी कोल्ड चेन कंपनीवर नजर
आयबीएमच्या सायबरसिक्योरिटी युनिटचे म्हणणे आहे की, या कोल्ड चेनच्या विविध पैलूंबद्दल माहिती गोळा करण्यासाठी एकत्रितपणे कार्यरत असलेल्या हॅकर्सच्या अ‍ॅडव्हान्स ग्रुप बद्दल त्यांना माहिती मिळाली आहे. हे हॅकर्स हायर बायोमेडीकलच्या अधिका-यांना ईमेल पाठवत आहेत. ही एक चिनी कंपनी आहे, जी कोल्ड चेन प्रोव्हायडर आहे. तसेच ती लसींचे ट्रांसपोर्ट आणि बायोलॉजिकल सॅम्पलच्या स्टोरेजचे काम करते.

लसीचा दुष्परिणाम; नुकसान भरपाई मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या