21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहैतीच्या राष्ट्रपतींची गोळ्या घालून हत्या

हैतीच्या राष्ट्रपतींची गोळ्या घालून हत्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॅरिबियन देशातील हैतीचे राष्ट्रपती असलेले जोवेनल मॉईस यांची काही अज्ञातांनी घरात घुसून हत्या केली आहे. पंतप्रधान क्लॉडी जोसेफ यांनी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येची पुष्टी केली. घरात घुसलेल्या लोकांनी अध्यक्ष जोवेनल मॉईस यांना गोळ्या घालून ठार मारले अशी माहिती समोर येत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाच्या वतीने या हत्याकांडाबद्दल निवेदन देण्यात आले असून हा हल्ला बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या आहेत.

काही अज्ञात लोकांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थानी जाऊन त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होता, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. एका कमांडो गटाने हे हत्याकांड घडवून आणले असून त्यांच्याकडे परदेशी शस्त्रे असल्याचे सांगण्यात येत आहे. अंतरिम पंतप्रधान क्लॉडी जोसेफ म्हणाले की, राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी यांनाही गोळ्या लागल्या पण त्या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला. पंतप्रधानांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

त्यांनी हे घृणास्पद, अमानवीय कृत्य असल्याचे म्हटले आहे आणि लोकांना संयम राखण्याचे आवाहनही केले आहे. जोसेफ म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि लोकशाही आणि प्रजासत्ताक यांचाच विजय होईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या