पॅरिस : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच आता मंकीपॉक्सची दहशत निर्माण झाली आहे. फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमने शुक्रवारी मंकीपॉक्सची लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे युरोपियन राष्ट्रे स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्ससह आफ्रिकेच्या काही भागांमध्येदेखील स्थानिक आजारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहे.
दरम्यान, वाढत्या मंकीपॉक्सच्या रूग्णांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. एका फ्रेंच अधिका-याने सांगितले की, एका २९ वर्षीय व्यक्तीची मंकीपॉक्स चाचणी सकारात्मक आली असून, बेल्जियनमध्ये या विषाणुची दोन प्रकरणे समोर आली आहे. तर, स्पेनमध्ये आज १४ नवीन रूग्णांची भर पडल्याने मंकीपॉक्स लागण झालेल्यांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे.
कॅनडामध्ये आतापर्यंत दोन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली असून, क्विबेक प्रांतातील अधिकारी १७ संशयित प्रकरणांची चौकशी करत आहेत. इटली आणि स्वीडनमध्ये प्रत्येकी एका मंकीपॉक्स प्रकरणाची नोंद झाली आहे. युकेमध्ये ६ मे पासून नऊ प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे.