26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeआंतरराष्ट्रीयडर्बनमध्ये मुसळधार पाऊस; पुरामुळे ३०६ हून अधिक लोकांचा मृत्यू

डर्बनमध्ये मुसळधार पाऊस; पुरामुळे ३०६ हून अधिक लोकांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

डर्बन : दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नाताल प्रांतात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पुरामुळे सुमारे ३०६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक कुटुंबे बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

संततधार पावसामुळे पूर परिस्थिती आहे. अनेक घरे कोसळली असून इमारतींचेही नुकसान झाले आहे. इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे ५२ दशलक्ष डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुमारे १२० शाळा पुराच्या पाण्याने वेढल्या आहेत. अंदाजे २६ दशलक्ष डॉलरपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत.

१८ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू
शिक्षणमंत्री अँजी मोशेगा यांनी माहिती दिली की, पुरामुळे विविध शाळांमधील सुमारे १८ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. एका निवेदनात त्यांनी सांगितले की, ही एक दु:खद बाब आहे आणि यामुळे भयंकर नुकसान झाले आहे. हा चिंतेचा विषय आहे. पावसाचा जोर कायम राहणार असून बाधित भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या