21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान; तब्बल ३५७ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान; तब्बल ३५७ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पावसाने थैमान घातले आहे. गेल्या पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानातील राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे. एनडीएमएच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानात १४ जूनपासून मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे जीवितहानी, घरे कोसळणे, रस्ते खचणे अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत.

एनडीएमएच्या आकडेवारीनुसार, २३,७९२ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणचे पूल वाहून गेले असून दुकानांचे नुकसान झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देश वातावरणीय बदलांचा सामना करत असून देशात निर्माण झालेली पूरस्थिती दूर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

बलूचिस्तानमध्ये १०६ बळी
पाकिस्तानातील पूरस्थितीमुळे सर्वाधिक मृत्यू बलूचिस्तान प्रांतात झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीसारख्या घटनांमुळे १०६ जणांचा मृत्यू झाला. सिंध प्रांतात ९० लोकांचा मृत्यू झालो. एनडीएमएने दिलेल्या माहितीनुसार पंजाब प्रांतात ७६, खैबर पख्तूनख्वामध्ये ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, देशातील इतर भागात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सैन्यदल आणि स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांच्या बचावासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या