25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनाशी लढणा-या भारताला मदत करा

कोरोनाशी लढणा-या भारताला मदत करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील वाढत्या कोरोना संसर्गाने गंभीर रुप धारण केले आहे. त्यापार्श्वभुमीवर पर्यावरणवादी स्वीडिश कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट करत जागतिक समुदायाला भारताला मदत करण्याचे आवाहन केले आहे. भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती अत्यंत वेदनादायी आहे. जागतिक समुदायाने पुढाकार घेतला पाहिजे आणि भारताला आवश्यक ती सर्व मदत केली पाहिजे असे ग्रेटाने आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. काही दिवसांपुर्वी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर टीका केल्याबद्दल ग्रेटा मोदी भक्तांच्या टीकेचे लक्ष्य ठरली होती. मात्र आता ग्रेटाने केलेल्या मदतीच्या आवाहनावर त्यांची प्रतिक्रिया पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरिकेकडूनही मदतीचे आश्वासन
कोरोना प्रतिबंधक लसीसाठी लागणारा कच्चा माल भारतीय औषध उत्पादक कंपन्यांना पुरविण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. मात्र अमेरिकेतीलच भारतसमर्थकांकडून वाढलेल्या दबावामुळे रविवारी अमेरिकेने आपला सूर बदलला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी कोरोनाच्या संकटाशी झगडणा-या भारताबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत. भारतीयांना मदतीसाठी लवकरात लवकर पावले उचलू,असे आश्वासन दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनीही आम्ही भारताला अधिक पुरवठा व समर्थन देण्यासाठी २४ तास काम करीत असल्याचे म्हटले आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने देश हादरला; पंतप्रधान मोदींची कबुली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या