27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमी सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

मी सर्व काश्मीरी नागरिकांचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय. मागील दोन दिवसात त्यांनी दुस-यांदा आरएसएवरविरोधात वक्तव्य केले आहे. तसंच, पाक आॅक्युपाइड काश्मीरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान त्यांनी स्वत:ला सर्व काश्मीरींचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हटले.

१६ जुलै रोजी उज्बेकिस्तानमध्ये झालेल्या सेंट्रल साउथ एशिया कॉन्फ्रेंसमध्ये इम्रान खान आले होते. त्यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेने भारताकडून त्यांना प्रश्न विचारला होता की, दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकते का ? या प्रश्नाला उत्तर देताना इम्रान खान म्हणाले की, आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत की, भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत. दोन्ही देश सभ्य शेजाºयासारखे राहावेत. पण, करणार काय ? आरएसएसची विचारधारा आडवी येते. यानंतर त्यांना तालिबानवर तुमचा कंट्रोल नाही का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इम्रान यांनी उत्तर देणे टाळले.

संघाची विचारधारा भारतासाठी धोकादायक
त्यानंतर इम्रान खान १७ जुलै रोजी बाघमध्ये निवडणूक रॅलीसाठी गेले होते. तेव्हा परत एकदा त्यांनी संघावर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपा आणि संघाची विचारधारा भारतासाठी खूप धोकादायक आहे. भाजपा-संघाची विचारधारा फक्त मुस्लिमांनाच टार्गेट करत नाही, तर शिख, खिश्चन आणि दलितांनाही टार्गेट करते. संघाला या सर्व समाजातील लोकांना बरोबर येऊ द्यायचे नाहीये.

३७० वरुन मोदींवर निशाणा
यावेळी इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाची निंदा केली. ५ आॅगस्ट २०१९ नंतर काश्मीरमध्ये अत्याचार वाढला, असा आरोप इम्रान यांनी केला. तसेच, त्यांनी स्वत:ला सर्व काश्मीरींचा ब्रांड अ‍ॅम्बेसडरदेखील म्हटले.

ब्राह्मण समाजासाठी मायावतींचा मास्टर प्लॅन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या