24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहरलो तर कदाचित देशच सोडेन डोनाल्ड ट्रम्प

हरलो तर कदाचित देशच सोडेन डोनाल्ड ट्रम्प

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून ज्यो बायडेन निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. निवडणुक प्रचाराच्या प्रांरभिक टप्प्यांपासूनच ज्यो बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर असल्याची सर्वेक्षणे आली आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही जनमताचा अंदाज विरोधात असल्याचे जाणवत असल्याचे त्यांच्या विधानरांवरुन दिसून येत आहे.

कधी ते चीनला धडा शिकविण्याची घोषणा करतात, तर कधी ‘अमेरिका फर्स्ट’या मागील निवडणुकीत गाजलेल्या घोषणेचा पुनरुच्चार करतात. भावनिक आवाहने करुन ते ज्यो बायडेन यांनी मिळवलेली आघाडी कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता पुन्हा त्यांनी अमेरिकन नागरिकांना भावनिक साद घातली आहे. जॉर्जिया माकॉन येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी ‘जो बायडेन यांच्याविरोधात निवडणूक हरलो, तर मला अमेरिका सोडावी लागेल’ असे अत्यंत भावनिक विधान केले आहे. सभेत त्यांनी बायडेन यांच्यावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला.

‘राष्ट्राध्यक्षीय राजकारणाच्या इतिहासात मी एका वाईट उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे अशा उमेदवाराविरोधात निवडणूक लढवताना तुमच्यावर दबाव येतो’, असे ट्रम्प यांनी सांगितले. ‘निवडणुकीत माझा पराभव झाला तर राजकारणाच्या इतिहासात एका वाईट उमेदवाराकडून माझा पराभव झाला असेच मी आयुष्यभर म्हणत रहीन. मला अजिबात चांगले वाटणार नाही. मला कदाचित देश सोडावा लागेल. मला पुढे काय घडणार, याबद्दल अजिबात माहित नाही’ अशी पुस्तीही ट्रम्प यांनी पुढे जोडली.राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक ३ नोव्हेंबरला होत असून ट्रम्प यांची भावनिक आवाहने लोकांना भावतात का ज्यो बायडन यांचा जोरदार प्रचार हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या